'गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे...'

'गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे...'

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता आज महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे...'
चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांना जामीन मंजूर

आदित्य ठाकरे म्हणाले की, त्या बैठकीतून काय निष्पन्न होतं हे बघावं लागेल. त्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. गेल्या एक-दोन आठवड्यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री अ‍ॅग्रेसिव्ह झाले आहेत. तसं आपल्याकडून घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री बोलताना दिसत नाहीत हीच दुःखाची गोष्ट आहे. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग घेऊन गेलेत तसं कर्नाटक निवडणुकीसाठी इथले जिल्हे घेऊन जाऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

'गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जिल्हे...'
'त्या' वक्तव्यावर नितेश राणे ठाम; म्हणाले, बोलण्याचा अधिकार...

मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना शिंदे सरकारने काल मान्यता दिली. यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले आहे. मी यावर पत्रकार परिषद घेणार होतो. त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी 24 तास त्यांना दिले. थोडी आपण पण माहिती घ्या, मी पण माहिती घेतो. यामध्ये साधारणपणे 50 हजार कोटींची गुंतवणूक आहे त्यात विस्ताराचे प्रकल्प आहेत. म्हणजे प्रकल्प जुनेच आहेत. पण, त्यांना वाढीव द्यायचं असतं ते आहे. दुसरे असे प्रकल्प आहेत म्हणजे एन्डोरामाँ प्रकल्प यावर आम्ही मे महिन्यामध्ये डाओसमध्ये सही केली होती. तर, मागील वर्षी रिलायन्स प्रकल्पावरही आम्ही दुबईमध्ये सही केली होती. या सगळ्यांची माहिती मी देणारच आहे. 70 हजार कोटीमध्ये 50 हजार कोटी जुने किंवा विस्तार प्रकल्प आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अमित शहा यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com