AAP
AAPTeam Lokshahi

गुजरातनंतर आपचे लक्ष आता महाराष्ट्रावर; मुंबई पालिकेसाठी कसली कंबर

मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष तयारीत लागले असताना आता आम आदमी पक्ष देखील मुंबईत आपले हात-पाय पसरू लागली आहे

सीमा दाते | मुंबई : गुजरात, दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रतही आम आदमी पक्ष वाढवण्यासाठी राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी विशेष लक्ष आणि गुजरात पॅटर्न वापरण्यासाठी इटालीय यांना नियुक्त करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सगळेच पक्ष तयारीत लागले असताना आता आम आदमी पक्ष देखील मुंबईत आपले हात-पाय पसरू लागली आहे. मुंबई महापालिकेसाठी आम आदमी पक्षाची ही पहिली निवडणूक असणार आहे. यासाठी आधी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे आवाहन आम आदमी पक्षासमोर आहे.

AAP
फडणवीस तुम्ही नवखे आहात, तरीही शरद पवारांवर... : भास्कर जाधव

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी गेले काही महिने महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणाने वेग घेतला. सगळेच पक्ष मुंबई महापालिका निवडणूक लढायच्या तयारीत असताना आम आदमी पक्ष देखील आता निवडणुकीची तयारी करत आहे. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवावा यासाठी आम आदमी पक्ष जोरदार तयारी करू लागली आहे. विशेष म्हणजे दिल्ली आणि पंजाबमध्ये जास्त जागा आल्या आहेत. तर गुजरातच्या विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित झाला आहे. यासाठी तोच फॉर्मुला मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्यासाठी राष्ट्रीय सहचिटणीस यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती महाराष्ट्रासाठी करण्यात आली आहे.

सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट, शिंदे गट, भाजप आणि मनसे विशेष तयारी करताना पाहायला मिळतं आहे. मात्र, आम आदमी पक्षाची ही मुंबईतील पहिली निवडणूक असणार आहे. यासाठी त्यांना नवीन मुद्दे घेऊन ही निवडणूक लढावी लागणार आहे. मात्र, आधीच या सगळ्या पक्षांनी आपले मतदार ठरवून ठेवल्यानंतर आता आम आदमी पक्षाला मतदार आपल्याकडे वळवावे लागणार आहे. यासाठी नवीन धोरण या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे असेल.

AAP
बिहारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा...; भुजबळांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

दरम्यान, मुंबई महापालिकेवर गेली ३० वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. त्यानंतर आता भाजप, मनसे सत्तेसाठी लढाईत आहे. मुंबईत असलेला मतदार वर्ग हा जास्तीत जास्त शिवसेनेकडे आकर्षित होतो. त्यात आता शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे ही महापालिका निवडणूक सगळ्याच पक्षासाठी आव्हानात्मक असणार आहे असे असताना आम आदमी पक्षाकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com