Amol Kolhe : शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले...

Amol Kolhe : शरद पवारांची भेट घेतल्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले...

आज अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बाग येथे अमोल कोल्हे यांनी भेट घेतली. काल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे म्हटले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमोल कोल्हे म्हणाले की, उद्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु होतोय. किल्ले शिवनेरीच्या पायथ्यापासून मोर्चा सुरु होतोय. कांदा निर्यातबंदीच्या मुद्द्यावर शेतकरी मोर्चा आहे. शेतकरी आक्रोश मोर्चावर पवारांशी चर्चा केली. उद्याच्या मोर्चासाठी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतलं. मोर्चाची सांगता शरद पवार यांच्या सभेने होणार. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. असे अमोल कोल्हे म्हणाले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, अजित पवार मोठे नेते. अजित पवारांनी तेव्हाच माझा कान का धरला नाही. अजित पवार मोठे नेते त्यांना कान धरण्याचा अधिकार. इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं म्हणजे माझा गौरव. अजित पवारांविषयी आदर कायम राहिलं. प्रतिक्रिया देणं मला शोभणार नाही. अजितदादांनी तेव्हाच कानउघडणी करायला हवी होती. राजकीय भूमिका बदलल्याणं अजित पवारांची माझ्यावर टीका. अजित पवारांना स्वत: भेटून त्यांचे मतं समजून घेईन. 30 तारखेला शरद पवारांची विराट सभा होणार. शिरुरमधील जनतेवर माझा पूर्ण विश्वास. अजित पवारांनी केंद्राला दरारा दाखवावा. अजित पवारांनी तात्काळ निर्यात बंदी उठवायला लावावी. असे अमोल कोल्हे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com