Dhananjay Munde: कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Dhananjay Munde: कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Published by :
Team Lokshahi

Dhananjay Munde Corona Positive : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यातच आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते पुण्यातील घरी क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. यात त्यांची टेस्ट पॉसिटिव्ह आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे येथे त्यांच्या राहत्या घरी ते सध्या क्वारंटाइन आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जेएन 1 हा कोरोनाचा नवीन विषाणू पसरत आहे. या आजाराचे काही रुग्णदेखील आढळले आहेत. मात्र, नागरिकांना घाबरून न जाता कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यांची तपासणी केली असता मुंडे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंडे त्यांच्या पुण्यातील घरी क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डब्लूएचओ च्या रिपोर्टनुसार, या महिन्यात कोरोनाच्या जेएन. 1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये 26 टक्के वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. पण ज्याप्रकारे रुग्णांची संख्या वाढत आहे, ते पाहता डब्लूएचओने सर्व देशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

मागील 15 दिवसांमध्ये देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतामध्ये सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3742 इतकी झाली आहे. जेएन.1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सक्रीय रुग्णांच संख्या दुपट्ट झाली आहे. जगभराप्रमाणेच भारतामध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com