'तो' फोटो अंडरवर्ल्ड लोकांसोबत आहे का? अजित पवार संतापले

'तो' फोटो अंडरवर्ल्ड लोकांसोबत आहे का? अजित पवार संतापले

अदानी मुद्द्यावरून राज्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे.

प्रशांत जगताप | सातारा : अदानी मुद्द्यावरून राज्यात आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. नुकतेच, काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी एक जुना फोटो शेअर करत शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला होता. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते संतापल्याचे दिसून आले. तो फोटो अंडरवर्ल्ड लोकांसोबत आहे का? असे म्हणत अजित पवारांनी म्हंटले आहे.

'तो' फोटो अंडरवर्ल्ड लोकांसोबत आहे का? अजित पवार संतापले
अयोध्येत शिंदे-फडणवीस श्रीरामाच्या चरणी लीन; राम मंदिराला धनुष्यबाण भेट

अदानी आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो ट्विट केला असल्याबाबत तो अदानीसोबत आहे. अंडरवर्डच्या लोकांसोबत नाही ना? उद्योगपतींसोबत फोटो काढला तर आम्ही काय दोष केला? फोटो काढताना आम्ही कोणाला नाही म्हणू शकत नाही. मी आदानी यांना पहिल्यापासून ओळखतो. देशात टाटा बिर्ला यांनी पाया रचला आणि मोठे काम करून दाखवलं. किती लोकांना रोजगार मिळवून दिला तशाच पद्धतीने अंबानी आणि अदानी यांनी पण काम केलं आहे.

सुप्रीम कोर्टाने समिती नेमण्याचे सांगितले आहे, उद्या समिती नेमल्यानंतर त्यातील वस्तुस्थिती काय आहे हे समोर येईल मात्र लगेचच कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे हे बरोबर नाही, असे अजित पवारांनी म्हंटले आहे. तर, या फोटोमुळे यामध्ये महाविकास आघाडीत फूट पडण्याचा काही संबंध नाही. जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकत्र आहेत तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीला काही होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिंदे-फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्यावरुनही अजित पवारांनी जोरदार तयारी केली आहे. प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. तसेच मुख्यमंत्री हे अयोध्येला रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. मात्र, आम्ही कधी इकडे जाणार तिकडे जाणार हे सांगत नाही. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात द्वेष पसरवण्यात कोणी करू नये एवढीच अपेक्षा आमची आहे, असे त्यांनी सांगितले. आताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com