अजित पवार - भाजपात लोकसभा-विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

अजित पवार - भाजपात लोकसभा-विधानसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला

अजित पवार आणि भाजपा यांच्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अजित पवार आणि भाजपा यांच्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार गटाकडे 40 पेक्षा जास्त आमदारांच समर्थन आहे. अजित पवार यांनी विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 आणि विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात अजित पवार यांचा गट लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या 90 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

यावर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, निवडणूका लागत नाही, तो पर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही.राष्ट्रवादी 90 जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्वाच नाही. असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com