....तर मी राजकारण सोडेन; 'त्या' आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

....तर मी राजकारण सोडेन; 'त्या' आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर

शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवारांवर आरोप केला होता. याला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी अजित पवार अर्थमंत्री असताना खोक्यांशिवाय काम करत नव्हते, असा आरोप केला होता. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एकाने जरी मी अर्थमंत्री असताना पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान अजित पवार यांनी दिले आहे.

....तर मी राजकारण सोडेन; 'त्या' आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर
रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले, ...हिस्सा मिळाला पाहिजे

अजित पवार म्हणाले की, एकाने जरी मी अर्थमंत्री असताना पैसे घेतले असे सांगितले तर मी राजकारण सोडेन आणि कृपाल तुमाने यांनी सिद्ध करून दाखवावे आणि नाही सिध्द करुन दाखवलं तर त्याने घरी बसायची तयारी ठेवावी, असा सज्जड इशारा त्यांनी कृपाल तुमाने यांना दिला आहे.

हे असले आरोप माझ्यावर करायचे नाही. खाजगीत कुणालाही विचारा माझ्या कामाची पद्धत कशी आहे ती... उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला... त्याने एक तरी माणूस उभा करावा माझ्यासमोर अजित पवारांना पैसे दिल्यावर काम झाले सांगणारा, असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी खासदार कृपाल तुमाने यांना दिले.

दरम्यान, सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे. 'शासन आपल्या दारी' शासनाने जो उपक्रम सुरू केला आहे त्यात काही ठिकाणी खुर्च्या रिकाम्या दिसत आहे. त्याचे फोटो येत आहेत. मंत्र्यांचा तोल जातो आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. जाहिराती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या व खोट्या आणि शासनाने निर्णय न घेतलेल्या जाहिराती दाखवून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जात आहे, असा थेट आरोप अजित पवार यांनी केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com