Ajit Pawar Corona Positive : अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण तरीही बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

Ajit Pawar Corona Positive : अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण तरीही बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पुन्हा कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असताना अजित पवाह हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.
Published by :
Shweta Chavan-Zagade

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना पुन्हा कोरोनाची लागण (corona positive) झाली आहे. महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला असताना अजित पवाह हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. रविवारी आणि सोमवारी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यावेळी नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे अजित पवार यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. मात्र, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Ajit Pawar Corona Positive : अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण तरीही बहुमत चाचणीला उपस्थित राहणार
विधानसभा अध्यक्ष : भाजपकडून नार्वेकर, तर मविआकडून साळवींना उमेदवारी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजसोबत नवीन सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांना तीन व चार तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com