खोके दिले म्हणजे सर्व जमत नसतं; वेदांतावरुन अजित पवार शिंदे सरकारवर संतापले
बीड : वेदांता प्रकल्पाप्रकरणावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच जापले आहे. अशातच खोके दिले म्हणजे सर्व जमत नसतं. राज्यात काय सुरू ते सांगा, असा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते अजित पवार शिंदे सरकारवर संतापले. ते आज बीडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, महिला पदाधिकारी देखील कार्यक्रमांना आल्या पाहिजेत. तरुणांना, सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष म्हणून आपल्याकडे पहिल जातं. नुसतं भाषणातून सांगून आमदार खासदार निवडून येत नाही. त्यासाठी काम करावं लागतं, असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. सहा जागा येणं शक्य नाही. सतत संपर्क ठेवला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मराठवाड्याचा कायापालट झाला पाहिजे. मात्र, तेथील जिल्हा बँका, दूध संघ चांगल्या पाहिजे. नोकरी मागायला गेलेल्या तरुणावर नांदेडमध्ये हल्ला झाला. भरतीसाठी शिंदे सरकार आलं पुढाकार घेतला पाहिजे. मात्र, दुर्दैवाने तसं दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
वेदांतामुळे आमच्यावर आरोप करतात. मात्र, त्यावेळी आमचं सरकार नव्हतं. मागच्या सरकारने काय केलं, असे नेहमी म्हणता. खोके दिले म्हणजे सर्व जमत नसतं. महाराष्ट्राच्या तरुण-तरुणींनी पेटून उठले पाहिजे. दुसरे प्रकल्प आणायला घरचे आहे का? राज्यात काय सुरू ते सांगा अजित पवार शिंदे सरकरवर संतापले. आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास न होणारा प्रकल्प येणार असेत तर आम्हीदेखील पाठिंबा देऊ, असा टोलाही उदयोगमंत्री उदय सामंत यांना लगावला आहे.
सत्तेची नशा उतरवण्याची ताकद मतदारांमध्ये आहे. केंद्रात तुमचं सरकार काही राज्यात तुमचं सरकार आणखी किती पाहिजे. अस्वस्थता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. खोक्याचे राजकारण करण्याचं काम करण्यास सांगितले नाही. तुम्ही दोघेच सरकार चालवता. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कायादा सुव्यवस्था ढासळत आहे. सरकारमध्ये असणाऱ्या आमदारानीच गोळीबार केला तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
पालकमंत्री पदाचा अदयापही अनेक नेत्यांनी चार्ज घेतला नाही. सांगतात काय तर पितृपक्ष पंधरवडा आहे म्हणून चार्ज घेतला नाही. अस कुठं असते. मागे गणेशोत्सव म्हणून चार्ज घेतला नाही. काय दिल्यावर हे नेते चार्ज घेतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाराष्ट्राने कधीच फुटाफुटीच्या राजकारणाला महत्व दिले नाही, असेदेखील अजित पवारांनी म्हंटले आहे.