राजकारण
सुप्रिया ताईंचं इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व तरी पक्ष राज्याच्या बाहेर वाढला नाही; असं कोण म्हणाले?
अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर टीका केली आहे. उमेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अगोदर पासून खासदार सुप्रियाताई सुळे यांना पक्षाने प्रोजेक्ट केले होते. मात्र सुप्रियाताई यांचे प्रोजेक्शन का झाले नाही हा त्यांच्या कर्तुत्वाचा भाग आहे.
तसेच जनतेला जे आवडतात ते लोकनेते होतात. शरद पवार, अजित पवार लोकनेते झाले. सुप्रिया ताईंचं इंग्रजी, हिंदी भाषेवर प्रभुत्व तरी देखील पक्ष राज्याच्या बाहेर वाढला नाही. देश पातळीवर लक्ष न घालता स्थानिक पातळीवरच राजकारण केले. असे उमेश पाटील म्हणाले.