राजकारण
महायुती सरकारमध्ये अजित पवारांची घुसमट?
उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 20 दिवसानंतर मंत्रालयात गेले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 20 दिवसानंतर मंत्रालयात गेले आहेत. डेंग्यूमुळं आजारी असल्यानं त्यांनी ते वीस दिवसांपासून मंत्रालयात आले नव्हते. त्यांना डेंग्यू झाला होता असं सांगण्यात येत होतं. पण शिवसेनेला त्यांच्या आजारावर संशय आहे.
डेंग्यूनं आजारी असलेले अजित पवार शासकीय कार्यक्रमांना गैरहजर राहत होते. पण यात आजारपणाच्या काळात त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. शिवाय भारत-न्यूझीलंड सामन्याचा आनंदही लुटला. बारामतीत घरगुती दिवाळीही साजरी केली शिवाय कार्यकर्त्यांच्याही भेटीगाठी घेतल्या. आणि यामुळेच त्यांच्या आजारवर संशय व्यक्त केला जात आहे.