अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण: अजित पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरण: अजित पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळी झाडून घेतल्या.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, ही घटना अतिशय चुकीची घटना घडली आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रात अशी घटना घडताच कामा नये. याचा नीट तपास झाला असेल. दहिसरच्या घटनेत वैयक्तित वादातून गोळीबार. प्रकरणाचा सखोल तपास व्हायला हवा. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.

विरोधक मोठ्या प्रमाणात सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेची पार्श्वभूमी तपासली पाहिजे. मॉरिसच्या मनात काहीतरी वेगळं सुरु होते. त्यासंदर्भात स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वर्षावर चर्चा केली. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com