शरद पवारांची निवृत्तीची घोषणा! अजित पवारांचे समर्थन? म्हणाले, नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा! अजित पवारांचे समर्थन? म्हणाले, नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू

राष्ट्रवादीचे सर्वच नेते व कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची साकडे घातले आहे. परंतु, अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजून काढत एकप्रकारे नव्या अध्यक्ष पदाचे समर्थन केले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. या भाषणादरम्यान शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते व कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची साकडे घातले आहे. परंतु, अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजून काढली. नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू, असे अजित पवारांनी म्हंटले आहे. यामुळे एकप्रकारे नव्या अध्यक्ष पदाचे अजित पवारांनी समर्थन केले असल्याची चर्चा रंगत आहे.

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा! अजित पवारांचे समर्थन? म्हणाले, नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू
तुम्ही सर्वांचे राजीनामे घ्या आणि...; निवृत्तीच्या घोषणेनंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर

अजित पवार म्हणाले की, तुम्ही गैरसमज करुन घेत आहेत. शरद पवार अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही अशातला भाग नाही. आज कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आहेत. पण, कॉंग्रेस सोनिया गांधींकडे बघून चालली आहे. यामुळे शरद पवारांचा वयाचा विचार करता सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ. ते नेतृत्व शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी हे कोणी येड्यागबाळ्याचं सांगण्याचं काम नाही. आता पवार यांनी निर्णय घेतला आहे. लोकशाहीमध्ये ते जनतेचे ऐकतं असतात. शरद पवार आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. जो अध्यक्ष होईल. तो शरद पवारांच्या मार्गदर्शनापेक्षा दुसरं कुठलंही काम करणार नाही. तर अल्पसंख्याक समाजाने असं का मनात आणत आहेत की साहेब अध्यक्ष राहीले तरच अल्पसंख्याकांच्या मागे उभे राहतील. अध्यक्ष नसतील तर मागे उभे राहणार नाहीत. हे साहेबांच्या रक्तात नाही. हा सगळ परिवार असाच पुढे चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका. शरद पवारांनी सांगितले भाकरी फिरवायची असते.

शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. ते अजिबात मागे घेणार नाहीत. ते निर्णयावर ठाम आहेत, असे काकींनी सांगितले आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. आपण सर्व त्या अध्यक्षाला साथ देऊ. आपण त्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू. अध्यक्ष नवीन गोष्टी शिकत जाईल. वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन बैठक घेईल. घरामध्ये वय झाल्यावर नवीन लोकांना संधी देतो, शिकवतो. त्यांच्या अधिपत्याखाली मार्गदर्शन करत असतो. तशा पध्दतीने गोष्टी होतील. शेवटी कोणीही अध्यक्ष झाले तरी साहेबांच्या जीवावरच राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. तरीसुध्दा कोणत्याही तिडममिड्या ज्योतिषीची गरज नाही.

कधी काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांदेखत नवीन अध्यक्ष तयार झाला तर का नको. राजकारणातील बारकावे शरद पवार नव्या अध्यक्षाला सांगतील. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. शरद पवार 1 मे रोजीच निवृत्ती जाहीर करणार होते. परंतु, मविआची सभा होती. म्हणून 2 मे रोजीची निवड केली, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com