फडणवीसांना भाषणाची संधी, अजित पवारांना 
नाही; PM मोदींनी डावलले?
Team Lokshahi

फडणवीसांना भाषणाची संधी, अजित पवारांना नाही; PM मोदींनी डावलले?

उपमुख्यमंत्र्यांनाच डावलल्याने आता राजकीय वाद रंगणार

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) आज देहूत (Dehu) आले आहेत. यावेळी त्यांचे विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जगदीश मुळीक यांच्याकडून मोदींचे स्वागत करण्यात आले. यानंतर मोदींनी संत तुकोबारायांचे दर्शन घेऊन शिळा मंदिराचे लोकार्पण केले. मात्र, भाषणावेळी अजित पवार यांना बोलण्याची संधीच दिली नाही. तर, उपमुख्यमंत्र्यांनाच डावलल्याने आता राजकीय वाद रंगणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांना भाषणाची संधी, अजित पवारांना 
नाही; PM मोदींनी डावलले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच मंचावर

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रकांत पाटील, नरेंद्र मोदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी आजचा क्षण अभिमानाचा आहे, कारण देशाचे नाहीतर अखिल विश्वाचे लोकप्रिय पंतप्रधान येथे आले आहे. त्यांचं मी स्वागत करतो, अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. यानंतर अजित पवार भाषणास करतील, असे वाटत असतानाच पंतप्रधान मोदी भाषण करण्यास उठले. यामुळे उपमुख्यमंत्री असूनही अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, समारोपावेळी देखील अजित पवारांचे भाषण न झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

अजित पवारांना भाषण करून देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशाही प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत, मात्र देहू संस्थान कडून जे स्पष्टीकरण देण्यात आला आहे. त्यानुसार प्रोटॉकल नुसार प्रस्तावना तयार करण्यात आली होती. आणि त्यामध्ये अजित पवार यांच्या भाषणाचा उल्लेख कुठेही नव्हता असेही सांगण्यात आले. मात्र पालक मंत्री असलेल्या अजित पवारांनी कार्यक्रमांमध्ये भाषण का केलं नाही याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी पुण्यात मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी भाषणामध्ये राज्यपाल यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली होती. आणि त्याचमुळे अजित पवारांना भाषण करू दिले नाही का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो.

फडणवीसांना भाषणाची संधी, अजित पवारांना 
नाही; PM मोदींनी डावलले?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यास शरद पवारांचा नकार; 'या' व्यक्तीचे नाव केले पुढे

दरम्यान, देहू संस्थानकडून मोदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी देहूतील सभेसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाला. तर, श्री विठ्ठलाय नम:" म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज आपल्या देहूमधील भाषणाला सुरुवात केली. मस्तक आहे पायावरी या वारकरी संताच्या...असं म्हणून त्यांनी उपस्थितांना वंदन केलं. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या उद्घाटनाचं भाग्य देखील मला मिळालं होतं. पाच टप्प्यांमध्ये या पालखी मार्गाचं काम होईल. या मार्गामुळे अनेक भागांमध्ये प्रगतीला देखील चालना मिळणार आहे. या मार्गासाठी 11 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च केला जाईल असं मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com