शरद पवारानंतर अध्यक्षपदी अजित पवार योग्य; कोण म्हणाले असं?

शरद पवारानंतर अध्यक्षपदी अजित पवार योग्य; कोण म्हणाले असं?

शरद पवारांनी राजीनाम्यच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

विकास कोकरे | बारामती : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. राज्यभरातून या निर्णयाविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून शरद पवारांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून सर्वाच्यात भुवया उंचावल्या आहेत.

शरद पवारानंतर अध्यक्षपदी अजित पवार योग्य; कोण म्हणाले असं?
शरद पवारांची निवृत्तीची घोषणा! अजित पवारांचे समर्थन? म्हणाले, नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू

शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीचे सर्वच नेते व कार्यकर्ते भावूक झाले असून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याचे साकडे घातले आहे. परंतु, अजित पवारांनी कार्यकर्त्यांची समजून काढली. शरद पवारांचा वयाचा विचार करता सर्वांशी चर्चा करुन एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ. ते नेतृत्व शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. आपण सर्व नवीन अध्यक्षाला साथ देऊ. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठिशी उभे राहू, असे अजित पवारांनी म्हंटले होते. यामुळे एकप्रकारे नव्या अध्यक्ष पदाचे अजित पवारांनी समर्थन केले असल्याची चर्चा रंगली आहे.

अशातच, आता राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्ता विशाल जाधव यांनी शरद पवारांनंतर अध्यक्ष पदासाठी अजित पवार हेच योग्य असतील, असं मत व्यक्त केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या निर्णयाविरोधात कार्यकर्ते दुपारपासून उपोषणावर बसले होते. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवृत्तीच्या निर्णयावर दोन ते तीन दिवसात अंतिम विचार करणार असल्याचा निरोप शरद पवारांनी अजित पवारांकरवी पाठवला आहे. तसेच, राज्यातील राजीनामा सत्र ताबडतोब थांबवावे, असे आवाहनही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शरद पवारांनी केले असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com