तारीख ठरली ! 'या' दिवशी घेणार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ

तारीख ठरली ! 'या' दिवशी घेणार अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात एकापाठोपाठ एक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत युती सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

याच पार्श्वभूमीवर आता अजून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे लवकरच आता अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टला संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. असे रेडिफला मिळालेल्या माहितीनुसार एका अहवालात समजते.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यापूर्वी अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी नियमित संपर्कात होते. असे देखिल या अहवालात म्हटले आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व 16 आमदारांना अपात्र ठरवतील, त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले जाईल ज्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त होईल. असे या अहवालात सांगितले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com