गद्दार म्हटलं की यांचे धाबे दणाणतात; अजित पवारांचे शिंदे सरकारला चिमटे

गद्दार म्हटलं की यांचे धाबे दणाणतात; अजित पवारांचे शिंदे सरकारला चिमटे

अजित पवारांनी शिंदे सरकारवर सोडले टीकास्त्र

जळगाव : गद्दार म्हटलं की यांचे धाबे दणाणतात. पण, गद्दार म्हटलं की यांना काय लागायचे कारण आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.

गद्दार म्हटलं की यांचे धाबे दणाणतात. पण, गद्दार म्हटलं की यांना काय लागायचे कारण आहे? ज्यांनी कोणी गद्दारी केले असेल त्याला ते लागेल. आम्ही कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात गद्दारी चालणार नाही, असा घणाघात अजित पवार यांनी केला आहे.

वेदांता प्रकल्पात महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी पेटून उठले पाहिजे. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्पासाठी दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. वेदांता प्रकल्पासाठी सर्वस्वयुक्त तळेगाव येथे जागा एमआयडीसीने उपलब्ध केली होती. राज्यातील तीन लाख मुलामुलींना याद्वारे रोजगार मिळणार होता. मात्र, अजूनही वेळ गेलेली नाही. मुख्यमंत्री एकदा शिंदे अजूनही लक्ष द्या, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, आताची निवडलेली जागा आहे ही दबावाखाली निवडली असून हा प्रकल्प गेला तर गेला आपण यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असे एकदा शिंदे म्हणतात. मात्र मोठा प्रकल्प तर आणाच पण हा प्रकल्प का जाऊ देत आहात, केवळ गाजर दाखवण्याचे धंदे करत आहात का? असाच खणखणीत सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com