NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिले निवेदन प्रसिद्ध; रोहित पवार म्हणाले...

NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पहिले निवेदन प्रसिद्ध; रोहित पवार म्हणाले...

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करून राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाचे पहिले निवेदन प्रसिद्ध केले आहे. 'राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद हा न्यायप्रविष्ठ असून अंतिम निकालाच्या अधीन राहून, सर्वोच्च न्यायालयाने सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे' असे या निवेदनात म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, या निवेदनातील पहिलं वाक्य खरं असलं तरी लाल चौकटीतील अर्ध वाक्य अधिक सत्य आहे. कारण अंतिम निकालात न्यायालयाने परवानगी दिली तरच घड्याळ चिन्ह पुढे वापरता येईल, अन्यथा #घड्याळ तर जाईलच पण #वेळ कशी येईल याचा अंदाज लोकांचा विरोध बघता आजच येतोय. राजकारणाला अशा #अटी_लागू होत असतील तर याचं दुःख वाटतं पण विचार बदलल्यामुळे आणि ज्याचं राजकारणच विरोधी पक्षाला संपवण्याच्या #अटीवर चालतं त्यांच्यासोबत गेल्याने ही #वेळ आली, हे नाकारता येणार नाही!

दरम्यान, घड्याळ या चिन्हाबाबत लोकांमधील संभ्रम टाळण्यासाठी अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये निवेदन प्रसिद्ध करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com