अजित पवारांसह सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला; कारण काय?
राष्ट्रवादी काँगेस नेते अजित पवार यांनी 9 आमदारांना सोबत घेत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीतही गुंतागुंतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, काल पहिल्यांदाच या बंडखोर मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली.
त्यानंतर आता अजित पवार गटाचे सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. मंत्र्यानंतर आता सर्व आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल होत आहेत. शरद पवार देखिल याठिकाणी आता दाखल होतील. त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष होताना बघायला मिळाला होता. त्यानंतर आता मात्र शरद पवार यांच्या भेटीला हे सर्वजण आले आहेत.
याच्याआधी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शुक्रवारी पहिल्यांदा अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे आता या भेटीगाठी नेमक्या कशासाठी आहेत? यामधून कोणते राजकीय निर्णय होतात का? शरद पवार यावर नेमका काय निर्णय घेतात. हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.