राज्यपालांविरोधात अंबादास दानवेंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यपालांविरोधात अंबादास दानवेंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत.

सचिन बडे | औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन विरोधकांनी राज्यापालांवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यांच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. औरंगाबाद येथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सहभागी झाले होते.

राज्यपालांविरोधात अंबादास दानवेंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात
उध्दव ठाकरेंमध्ये धमक असेल तर...; बावनकुळेंचे आव्हान

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी दानवे आणि आंदोलनकर्त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केले. भाजपाची ही जाणीवपूर्वक कुटनिती असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तर, पोलिसांनी अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्याकडे रवाना केले आहे.

राज्यपालांविरोधात अंबादास दानवेंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात
राज्यपालांना हटवा अन्यथा जोडे कसे मारतात हे शिवसेना दाखवून देईल; राऊतांचा इशारा

काय म्हणाले होते राज्यपाल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

राज्यपालांविरोधात अंबादास दानवेंचे आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात
राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य! निलेश राणेंचा इशारा; ...तर महाराष्ट्र सहन करणार नाही
Lokshahi Marathi
www.lokshahi.com