Rajratna Ambedkar | Chandrakant Patil
Rajratna Ambedkar | Chandrakant Patil Team Lokshahi

पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला १ लाख रुपये रोख देणार, आंबेडकरांची घोषणा

राजरत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ–आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत.

राज्यात सध्या एकाच राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली, असं विधान होतं. त्यावरून एकच गदारोळ सुरु आहे. या दरम्यान, पुण्यात पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीवर ३०७ चा गुन्हाही दाखल करण्यात आला. यामुळे राज्यात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालं. त्याच पार्श्वभूमीवर राजरत्न आंबेडकर यांनी शाईफेक करणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

Rajratna Ambedkar | Chandrakant Patil
मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, रोहित पवारांचा टोला

राजरत्न आंबेडकर हे एका कार्यक्रमात बोलत होते त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरील हल्ल्याचं समर्थन केलं. तसेच, पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याला माझ्याकडून वैयक्तिक १ लाख रुपये देण्याची घोषणा करतो, असेही राजरत्न आंबडेकर यांनी जाहीर केले. राजरत्न हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाऊ–आनंदराव रामजी आंबेडकर यांचे पणतू आहेत. तर, मुकुंदराव आंबेडकर यांचे नातू आहेत. तसेच, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत आणि या माध्यमातून ते बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांचे विचार सर्व सामन्यांपर्यंत पोहचवतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com