राजकारण
Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यावर मनसेची मोठी जबाबदारी?
पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरेंकडे देण्यात येणार आहे.
पुणे: पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरेंकडे देण्यात येणार आहे. 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीवर मनसेनं विशेष लक्ष दिलं असून पुणे लोकसभेची जबाबदारी अमित ठाकरेंकडे सोपविणयात येणार आहे. पक्षबांधणी, उमेदवारांची निवड आणि प्रचार या सर्व जबाबदाऱ्या अमित ठाकरे स्वतः पार पाडणार आहेत.