Amol Kolhe : अमोल कोल्हे घेणार शरद पवारांची भेट; कारण काय?

Amol Kolhe : अमोल कोल्हे घेणार शरद पवारांची भेट; कारण काय?

शिरुरच्या जागेवरून राजकीय वर्तुळात संघर्ष वाढणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शिरुरच्या जागेवरून राजकीय वर्तुळात संघर्ष वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गटाचा शिरुरवर दावा आहे. त्यामुळे आता शिरुरमध्ये अजित पवार गट विरोधात शरद पवार यांचा गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

शिरुरमध्ये अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे. शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असा विश्वास देखिल अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अजित पवारांनी अमोल कोल्हेंना थेट आव्हान दिलं आहे.

यानंतर आज आज अमोल कोल्हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पुण्यातील मोदी बाग येथे सकाळी 9 वाजता भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. काल अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे म्हटले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com