सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे गुडघ्याला बाशिंग बांधून...; मिटकरींचा निशाणा

सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे गुडघ्याला बाशिंग बांधून...; मिटकरींचा निशाणा

शेतकरी आक्रोश मोर्चाला शरद पवार गटाने सुरुवात केली आहे. यावरून अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

मुंबई : देशातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाला शरद पवार गटाने सुरुवात केली आहे. तर ३० डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. यावरून अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे गुडघ्याला बाशिंग बांधून...; मिटकरींचा निशाणा
राम मंदिराच्या सोहळ्याला सोनिया गांधी राहणार उपस्थित?

अमोल कोल्हे म्हणाले की, बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदार संघात अडकून राहावे लागणे यातच अजितदादांचे महत्व अधोरेखित होते, असा निशाणा त्यांनी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळेंवर साधला आहे.

दरम्यान, अजित पवारांनी अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवार देणार असून शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच, असे थेट आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी चॅलेंज दिले तर जिंकून दाखवतो, हे लक्षात ठेवा निकाल लागल्यावर कळेल, अशा शब्दात अजित पवारांनी म्हंटले आहे. यावर अमोल कोल्हेंनी चॅलेंज स्वीकारल्याचे म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com