राज्यात आज सर्वांनाच ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता आहे. काल ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान पार पडलं. आज मतमोजणीनंतर गावचा कारभारी ठरणार आहे. गावचा कारभार हाकण्यासाठी थेट जनतेतून 2 हजार 489 सरपंच निवडले जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रियात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यांचे हे ट्विट चर्चेत आलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे की, चांद्यापासून बांद्यापर्यंत #अजितपर्व... घड्याळ तेच वेळ नवी... असे म्हटले आहे.