अनिल देशमुखांना मोठा दिलासा! 11 महिन्यानंतर जामीन मंजूर

अनिल देशमुखांना मोठा दिलासा! 11 महिन्यानंतर जामीन मंजूर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झााल आहे. तब्बल 11 महिन्यानंतर ते आता कोठडीबाहेर येणार आहेत.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज अखेर त्यांना जामीन मंजूर केला आहे. तब्बल 11 महिन्यानंतर एक लाखांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु, सीबीआयच्या प्रकरणामध्ये जामीन मिळेपर्यंत देशमुखांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश दिल्यानंतर जामीन अर्जावर मागील आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्यात आली होती.

परंतु, निकाल राखीव ठेवला होता. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. व अखेर देशमुखांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, आता उच्च न्यायालयाविरोधात ईडी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. परंतु, सीबीआयच्या केसमध्ये जामीन मिळेपर्यंत अनिल देशमुखांना जेलमध्येच राहावे लागणार आहे.

दरम्यान, केंद्रीय अन्वेषण विभागाने देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार आणि अधिकृत पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध तपास सुरू केला होता. व नोव्हेंबर २०२१ मध्ये देशमुख यांना अटक केली. त्यानंतर सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एप्रिलमध्ये अटक केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com