​Anil Deshmukh : भाजपाच्या ऑफर देणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा ऑडिओ आणि व्हिडिओ, देशमुखांचा गौप्यस्फोट

​Anil Deshmukh : भाजपाच्या ऑफर देणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा ऑडिओ आणि व्हिडिओ, देशमुखांचा गौप्यस्फोट

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी मोठं गौप्यस्फोट केलं आहेत. यात अनिल देशमुख म्हणाले की, ​माझ्यावर आरोप लावल्यावर काही भाजपचे नेते माझ्याकडे आले. माझ्याकडे त्यांनी चार मुद्द्यांचा एक कागद आणून दिला. काही लिहून द्यायला सांगितले, ते जर मी लिहून दिले असते तर उद्धव ठाकरे सरकार ३ वर्षांपूर्वी पडले असते. मी लिहून देण्यास नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड झाली.

मी लिहून दिलं असते तर अटकेचा प्रश्नच नव्हता. लिहून दिले असते तर मी मंत्री झालो असतो. ​जो व्यक्ती माझ्याकडे ड्राफ्ट घेऊन आला त्या व्यक्तीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉडिंग आहे. जर मी काही मुद्दे सांगितले तर फार मोठा धमाका होईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा जवळचा माणूस माझ्याकडे अनेक वेळा आला होता. परमवीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले. खोट्या आरोपात मला फसविण्यात आले. ​पोलीस आयुक्त या प्रकरणाचा मास्टर माइंड होता हे धक्कादायक होतं. असे अनिल देशमुख म्हणाले.

तसेच अनिल देशमुख पुढे म्हणाले की, ​पोलीस आयुक्त या प्रकरणाचा मास्टर माइंड होता हे धक्कादायक होतं. एखादा अधिकारी चुकीचं करतो, म्हणजे संपूर्ण डिपार्टमेंट चुकीचं नसतं. सचिन वाझेला पुन्हा पोलीस खात्यात आणण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केले ही गोष्ट चुकीची आहे. ​अँटेलिया प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश परमबीर सिंग यांनी सचिन वाझेलाच दिली होती. माझ्यावर १०० कोटींचा आरोप केला, पण चार्जशीट १ कोटी ७१ लाखांची केली. हे आरोप फक्त सरकार पाडण्यासाठी केले होते. ​खोटे आरोप केल्यावर मला त्याचा जास्त त्रास झाला. मला अॅफिडेटीव्ह घेऊ आला होता, त्याच्या तोंडावर ते फेकून मारले. मी आयुष्यभर जेलमध्ये राहील पण कोणावर खोटे आरोप करणार नाही, असे त्या भाजपच्या नेत्याच्या माणसाला सांगितले. असे अनिल देशमुख म्हणाले.

​Anil Deshmukh : भाजपाच्या ऑफर देणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा ऑडिओ आणि व्हिडिओ, देशमुखांचा गौप्यस्फोट
Anil Deshmukh : जर मी हे काही मुद्दे सांगितले तर फार मोठा धमाका होईल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com