नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण वरचढ कसे दाखवले; अनिल परबांनी 'त्या' ठरावांचे दिले पुरावे

नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण वरचढ कसे दाखवले; अनिल परबांनी 'त्या' ठरावांचे दिले पुरावे

राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर उध्दव ठाकरे यांची महापत्रकार परिषद होत आहे. यावेळी अनिल परब यांनी लाव रे तो व्हिडीओ करत पुरावे सादर केले आहेत.

मुंबई : कपिल सिब्बल यांनी मांडलेल्या मुद्द्यावर 16 लोक अपात्र ठरतील, असे संपूर्ण देशाने ठरवले होते. निकालाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार अध्यक्ष यांना आहे. त्यासाठीही चौकट बनवली होती. परिशिष्ट 10 नुसार काही मुद्दे त्यांनी दिली होती. परंतु, राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टापेक्षा कसे वरचढ आहोत हे दाखवून दिले आहे, अशी टीका अनिल परब यांनी केली आहे. ते आज उध्दव ठाकरे यांची महापत्रकार परिषद बोलत होते.

1999 नंतर आमच्याकडे रेकॉर्डवर काही नाही. त्यामुळे सर्व अधिकार बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते आता बाळसाहेब नसल्यामुळे चिन्ह आणि पक्ष काढून घेतला. हा त्यांचा खोटेपणा आहे, अशी टीका अनिल परब यांनी नार्वेकरांवर केली आहे.

2013 माझ्याकडे राष्ट्रीय कार्यकारणी ही बैठक आयोजित केली होती. पक्ष घटनादुरुस्ती काही ठराव केले होते. शिवसेना प्रमुख हे नाव गोठवण्यात आले होते. शिवसेना पक्ष प्रमुख हे नवे पद तयार केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेले सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे सोपवले. उपनेत्याची संख्या 31 पैकी 21 निवडणूक आणि 10 अधिकृतरित्या घोषित करणे. त्यावेळी तत्कालीन शिवसेना नेते तथा आताचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तिथे उपस्थित होते.

- पक्ष घटना दुरुस्ती क्रमांक पद एक गोठविण्यात आले.

- शिवसेना पक्ष प्रमुख हे नवे पद निर्माण केले हा ठराव, रामदास कदम यांनी मांडला होता. याला मंजुरी गजानन किर्तीकर यांनी दिली होती.

- शिवसेना पक्ष घटनेतील कार्यकारी अध्यक्ष हे पद रद्द करण्यात आले होते.

- बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असलेले सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

- यांना राष्ट्रीय कार्यकारणी बरखस्त करण्याचा अधिकार आहेत.

- अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी त्यावेळी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे

2013, 2018 आणि 2022 साली निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले पुरावेही अनिल परबांनी स्क्रीनवर दाखवण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com