शिंदे गट नाराज आहेत का?’ मंत्री उदय सामंत यांनी सरळ सांगितले...

शिंदे गट नाराज आहेत का?’ मंत्री उदय सामंत यांनी सरळ सांगितले...

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या. पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची. त्यावर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले की, आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत. आमचा १० हजार टक्के एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. ज्या घडामोडी झाल्या आहेत त्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून विश्वासात घेऊन झालेल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढली जाईल.कुणीही नाराज नाही. ही बातमी तुम्हाला कुठून समजली ते माहित नाही.. लोकसभेचं अधिवेशन, विधानसभेचं अधिवेशन याविषयी मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. भविष्यात संघटनात्मक मांडणी कशी करायची यावरही चर्चा झाली. असे सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com