... तरच ही हुकूमशाही हाणून पाडता येईल; केजरीवालांचा मोदी सरकारवर घणाघात

... तरच ही हुकूमशाही हाणून पाडता येईल; केजरीवालांचा मोदी सरकारवर घणाघात

आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

मुंबई : आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवालांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सर्व विरोधक एकत्र आले तर ही हुकूमशाही हाणून पाडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीच्या नागरिकांवर अन्याय सुरु आहे. २३ मे २०१५ मध्ये एक नोटिफिकेशन्स काढून केंद्राने राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले. ८ वर्षांपासून आम्ही न्यायालयाचे चक्कर मारत होतो. सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण निर्णय दिल्लीच्या जनतेच्या बाजूने दिला. ८ दिवसांत केंद्राने निर्णय घेत पुन्हा सर्व अधिकार काढून घेतले. आता हे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजुरीसाठी येईल. त्यावेळी ते नामंजूर करण्याचे आवाहन आज पवारांना केले. पवारांनी आश्वासन दिले आहे की राज्यसभेत हे मंजूर होऊ देणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

भाजप विरहित सरकार तयार केली की केंद्र ३ प्रकारे अन्याय करते. एक तर आमदार खरेदी केली जाते. दुसरे ईडी व केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने सरकार पाडले जाते. तिसरे अध्यादेश व कायदे आणून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जाते. देशाच्या संविधानासाठी हे घातक आहे. देशाच्या सर्व लोकांपर्यंत आम्ही जातोय. ही फक्त दिल्लीची लढाई नाही विरोधकांची ही गोष्ट नाही, तर देशाची बाब आहे. सर्व विरोधक एकत्र आले तर ही हुकूमशाही हाणून पाडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

दरम्यान, भगवंत मान यांनीही पत्रकार परिषदेतून मोदी सरकारवर निशाणा साधला. जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे आपण म्हणतो. पण, दिवसेंदिवस हे लोकशाहीची हत्या करत आहेत. देशातील राज्यपाल हे स्टार कँपेनर झाले आहेत. तर राजभवन हे अड्डे झाले आहेत. रोज आढावा घेत आहेत. राज्यपालांनी किती वेळा त्रास दिला याची माहिती घेतली जात आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकवेळा शरद पवारांनी मदत केली आहे. आज लोकशाहीवर संकट आले आहे. त्यामुळे शरद पवार हे मदत करतील. जेव्हा भविष्यात कुणी विचारले तर आम्ही सांगू की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढलो, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com