फडणवीस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात पटाईत; अरविंद सावंतांचा पलटवार

फडणवीस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात पटाईत; अरविंद सावंतांचा पलटवार

कंत्राटी भरतीवरुन देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. या टीकेला अरविंद सावंतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : शरद पवारांच्या आशिर्वादाने आणि उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीने झालेल्या कंत्राटी भरतीच्या पापाचे ओझे आम्ही उचलणार नाही. असे सांगतानाच कंत्राटी भरतीचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय रद्द करीत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या टीकेला ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

फडणवीस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात पटाईत; अरविंद सावंतांचा पलटवार
आमदार अपात्रतेप्रकरणी याचिकांवर एकत्रित सुनावणीवर नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले...

अरविंद सावंत म्हणाले की, 2014 ला मुख्यमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस होते. 18 जानेवारी, 2023 ला मुख्यमंत्री कोण होते हे आठवून पहा. जानेवारी 2023 चा निर्णय बघा, कोण होतं मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यात पटाईत आहेत, असा पलटवार त्यांनी केला आहे.

नोकर वर्गाचा धोरण आहे ते उपेक्षित ठेवणार आहे. एका बाजूला संरक्षण दलात, अग्निवीर नावाने फौजेत 4 वर्षांसाठी जवान नेमला जातो. रेल्वे, पोस्ट ऑफिस, सगळ्या कंपन्या डबघाईला आणल्या आहेत. सामाजिक आरक्षणाचे लढे आणि जुनी पेंशन द्या या देखील समस्या सुरु आहेत. 240 दिवस कामगाराने आधी काम केलं की त्याला कायमचा ठेवले जाईल असा आधी नियम होता. 5 वर्षानंतर तुम्हाला सेवेत घेणार का नक्की नाही. त्याच्या कुशलतेच खच्चीकरण करण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि विल्हेवाट लावण्याचं काम सुरु आहे. कंत्राटी पद्धतीला आमचा विरोध आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

कोविडच्या वेळेस लोकं काम करायला तयार न्हवती. एका बाजूला निर्बंध होते. जीवावर उदार होऊन सगळ्यांनी काम केलं. महापालिकेत सेवेत त्यांना ठेऊन घेतलं. जीआर चुकीचा असेल तर तुम्ही सुधारा. तुम्ही का रि ओढत आहात. केंद्राला अग्निवीर दिसतात आणि राज्यात यांना पोलीस दिसतात. ज्यांनी सुरक्षा द्यावी तेच असुरक्षित आहेत. हम करे सो कायदा हे या सरकारचं धोरण आहे, असेही सावंतांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com