ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक; अरविंद सावंतांनी सांगितलं कारण

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक; अरविंद सावंतांनी सांगितलं कारण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या नेत्यांची बैठक आज शिवसेना भवन येथे पार पडली

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या नेत्यांची बैठक आज शिवसेना भवन येथे पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याचे ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी सांगितले. तर, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटाचे संयुक्त मेळावा जुलै व ऑगस्ट महिन्यात घेण्याचे ठरलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडची महत्वपूर्ण बैठक; अरविंद सावंतांनी सांगितलं कारण
शिवभक्तांना अडवाल तर परिणाम चांगले होणार नाही; संभाजीराजेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

महाराष्ट्र आज संभ्रमावस्थेतून जातोय. कुठल्याही विषयाला राजकीय रंग देणं किंवा भ्रम निर्माण करणं या दोन गोष्टी होत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत आज बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना ठाकरे गटाचे संयुक्त मेळावा जुलै महिन्यात रंगशारदा येथे एक संयुक्त कार्यक्रम घेण्याचे ठरलं आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्येही मेळावा होणार आहे. आम्ही शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहणार आहोत, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने स्पष्ट घेतली होती, असे अरविंद सावंत यांनी सांगितले आहे.

शिंदे गटाच्या वर्धापनदिनाबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलंय आणि जनतेनेही ठरवलंय की शिवसेना कोणाची आहे ते त्यामुळे ज्यांचा जन्मच झाला नाही त्यांचा वर्धापनदिन कसला, असा निशाणा त्यांनी शिंदे गटावर साधला आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवार हे कमळावर लढेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे वेळप्रसंगी सोबत असलेल्यांच मर्दन करून पुढे जायची भाजपची सवय आहे. त्याच्यासोबत असलेल्यांना त्याची प्रचिती येईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली असून हुडी घालून आले होते का भेटायला? खर बोललं की हुडहुडी भरते त्यामुळे आले असतील, असा जोरदार टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com