गुवाहाटीला पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले, पूर्वी आलो...

गुवाहाटीला पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले, पूर्वी आलो...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सहकारी आमदारांसह आज गुवाहाटीला पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आसाम सरकारने रेड कार्पेट अंथरले होते. त्यानंतर शिंदे यांच्यासह सर्व आमदारांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सत्तांतरानंतर शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र, सत्तास्थापनेच्या वेळेला जे केंद्र बनले होते. त्या आसाम मधील गुवाहाटीला आज एकनाथ शिंदे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा भेट दिली आहे. शिंदे गटाच्या या गुवाहाटी दौऱ्यावर सर्वांचेच लक्ष लागून होते. या दौऱ्यावर विरोधकांनी चांगलेच टीकास्त्र डागले होते. मात्र, आता गुवाहाटी विमानतळावर पाऊल ठेवताच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या समाचार घेतला आहे. आम्ही देवीचे भक्त आहोत. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. याची परिचिती सर्वांना आलीच असेल. त्यामुळे विरोधकांनी जपून बोलावं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

गुवाहाटीला पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार; म्हणाले, पूर्वी आलो...
पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडकडून गुणरत्न सदावर्तेवर शाईफेक

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

आसाम सरकारने आमचं स्वागत केलं. याचा आनंद आहे. समाधान आहे. कामाख्या देवीच्या दर्शनाला पुन्हा येण्याची संधी मिळाली. आजच आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहोत, कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. त्याची प्रचिती आम्हाला आली आहे. सरकार स्थापन झालं. सर्व सामान्य लोकांच्या मनातील सरकार स्थापन झालं. विरोधकांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असा चिमटा मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना काढला.

पुढे ते म्हणाले की, आम्ही श्रद्धेने आणि भक्तीभावाने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं. आम्ही दर्शनाला आलोय. सर्वांच्या मनात दर्शनाला यायचं होतं. पूर्वी आलो होतो. तेव्हा धावपळ झाली होती. त्यामुळे पुन्हा दर्शनाला जाण्याची सर्वांची इच्छा होती. त्यानसुार आज निवांत आलो, विरोधकांना टीका करायचा अधिकार आहे. त्यांना काम उरलं नाही. आम्ही काम करणारे लोकं आहोत. त्यांना टीका करू द्या आम्ही काम करत आहोत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसेच काही आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत. त्यामुळे ते या दौऱ्याला येऊ शकले नाहीत. त्यांनी तशी माझ्याकडे परवानगी घेतली होती, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com