मातोश्रीवर आढळला विषारी साप, भाजप नेते म्हणाले...

मातोश्रीवर आढळलेल्या सापाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांच्या प्रतिक्रिया
Published by :
Team Lokshahi

मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी साप आढळल्याची घटना घडली आहे. या सापाला रेस्क्यू करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी दुपारी मातोश्री बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना हा साप दिसला. त्यानंतर सर्पमित्राला बोलावून सापाला रेस्क्यू करण्यात आलं.

उद्धव ठाकरे यांना सापाबाबत समजताच ते लगोलग बाहेर आले आणि सापाला रेस्क्यू करताना पाहत होते. रेस्क्यू करून झाल्यावर सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मातोश्रीवर आढळलेल्या सापाच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) आणि प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com