'वरळीत आमच्या जीवावर जिंकलेल्यांचे थर गडगडून खाली येतील'

'वरळीत आमच्या जीवावर जिंकलेल्यांचे थर गडगडून खाली येतील'

आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना सणसणीत टोला

मुंबई : वरळीत आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे थर गडगडून खाली येतील, असा सणसणीत टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. सध्या वरळी मतदारसंघातील दहीहंडीवरुन भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युध्द रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने मुंबईतल्या दहीहंडी उत्सवाला रंग चढत चालला आहे, काहींचे रंग उडत चालले आहेत. गेली दोन वर्षे सणांवर बंदी घालत होते. शिंदे-फडणवीस सरकारने सर्व सणांवरील बंदी उठवली. भाजपने वरळी मध्ये दहीहंडी साजरी करणार ठरवल्यानंतर आता शिवसेनेला जाग आली. वरळीत आमच्या जीवावर जे जिंकले त्यांचे थर गडगडून खाली येतील, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेतच बसलेला सदस्य हा महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतो. केवळ तीन सदस्यांना दोन माईक आणि बाकीच्यांना एक माईक आहेत. या सदस्यांच्या दोन माईकबाबत संशय आहे, हे कुणाला बाहेर ऐकवण्यासाठी आहे का, कोण रेकॉर्डिंग करतयं का, असा संशय शेलारांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भाजपच्या प्रदेध्यक्षपदी आशिष शेलारांची नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी थेट आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपा दहीहंडी आयोजित करणार आहेत. महत्वाचे म्हणजे वरळी मतदारसंघात शिवसेनेचे तीन आमदार आणि नगरसेवक असूनही भाजपाने दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामुळे आता शिवसेनेला दुसरे मैदान शोधण्याची नामुष्की आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com