दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती; शेलारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती; शेलारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा

औरंगाबाद दौरादरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. याला आज भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : राज्यात पावसांनी धुमाकूळ घातला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. याला आज भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी स्वतः काही अडीच वर्षात केले नाही ते टीका करायला पुढे आलेत, असा टोला शेलारांनी उध्दव ठाकरेंना लगावला आहे.

दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती; शेलारांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
'अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

आशिष शेलार म्हणाले की, दोन वर्षे डिलीट करता आली असती तर केली असती. नवीन सरकारने सर्व मर्यादा बाजूला केल्याने सण उत्साहात साजरे होत आहेत. प्रकाशोत्सव आम्ही अनेक ठिकाणी आयोजित करत आहोत. आज रंगशारदामध्ये देखील सुरमयी सकाळ झाली, असे त्यांनी सांगितले. तसेच, ज्यांनी स्वतः काही अडीच वर्षात केले नाही ते आता टीका करायला पुढे आले, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी उध्दव ठाकरेंवर साधला आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदतच करत आहे, असेही शेलारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सत्तांतरानंतरच उद्धव ठाकरे रविवारी पहिल्यांदाच औरंगाबाद दौऱ्यावर होते. पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी उध्दव ठाकरेंनी केली. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार घोषणांची अतिवृष्टी करत आहे. मात्र, राज्य सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. शेतकऱ्यांनी आसूड दिला, हा आसूड सत्ताधाऱ्यांवर चालवला पाहिजे. रेशन घ्यायला पण, पैसे नाहीत. शिधा कुठूंन घेणार आता या मध्ये घोटाळा झाला नाही झाला हे नंतरच कळेल, अशीही टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे. तसेच, 50 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com