Ashish Shelar : आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण...

Ashish Shelar : आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण...

शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला.
Published by  :
Siddhi Naringrekar

शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. मनसेच्या दीपोस्तवाचं यंदा अकरावे वर्ष असून गीतकार जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते ‘दीपोत्सव २०२३’ चं उद्घाटन झालं. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपातर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात आशिष शेलार म्हणाले की, मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे. कलाकाराला जात, धर्म, भाषा नसते. पण, गुरूवारी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत एक उद्घाटन झालं.

तसेच ते पुढे म्हणाले की, आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल. आम्ही गायक उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन करतोय. आता मराठीचा प्रश्न कुणी कुणाला विचारायचा? असे आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com