...उबाठा गटाने आपल्या तोंडाची 'गटारे' बंदच ठेवावीत; शेलारांचा हल्लाबोल

...उबाठा गटाने आपल्या तोंडाची 'गटारे' बंदच ठेवावीत; शेलारांचा हल्लाबोल

पावसाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, पहिल्या दिवशी मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहिल्याच पावसात अंधेरी सबवे आणि मिलन सबवे या दोन्ही सबवे मध्ये पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाला. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरुन विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

...उबाठा गटाने आपल्या तोंडाची 'गटारे' बंदच ठेवावीत; शेलारांचा हल्लाबोल
भर पावसात मुख्यमंत्र्यांकडून पावसाळापूर्व कामांची पाहणी; म्हणाले, मी सरप्राईज...

जेव्हा मुंबईत नालेसफाई सुरू होती, भाजपाने उन्हातान्हात उतरुन पहाणी करुन नालेसफाईची कामे असमाधानकारक झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. वर्षानुवर्षांचे तेच कंत्राटदार, तीच पध्दत, तीच अपारदर्शकता, अधिकाऱ्यांची तीच लपवाछपवी, त्यामुळे कालच्या पहिल्या पावसातच पालिकेचे दावे वाहून गेले. पालिकेने अजूनही कंत्राटदारांची बाजू न घेता, काही उपाययोजना करता आल्या तर करव्यात. वर्षानुवर्षे पालिकेने कंत्राटदारांची काळजी केली, आता मुंबईकरांची काळजी करावी, असा टोला आशिष शेलारांनी बीएमसीला लगावला आहे.

बाकी, मुंबईकरांचे तथाकथित रखवालदार उबाठाचे माजी नगरसेवक, माजी महापौर या काळात गायब होते. आणि उबाठा प्रमुख लंडनमध्ये तेव्हा थंड हवा खात होते. त्यामुळे उबाठाने वर्षानुवर्षे पोसलेल्या कंत्राटदारांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात मुंबईत जी परिस्थिती उद्भवेल त्यावेळी...उबाठा गटाने आपल्या तोंडाची "गटारे" बंदच ठेवावीत, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर शरसंधान साधले आहे. उबाठा आणि उबाठाचे पाळीव कंत्राटदार हा जो एक "परिवार" तयार झालाय, तोच मुंबईकरांचा खरा गुन्हेगार, असेही आशिष शेलारांनी म्हंटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर सांताक्रूझ येथील मिलन सबवेला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. शहरात जागोजागी पाणी साचल्याने त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आज पाणी साचणाऱ्या जागाना भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच याठिकाणी पाणी साचू नये, असे सक्त निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला दिले. तसेच ट्रॅफिक जॅम होऊन इथे वाहने अडकून पडणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com