Ashish Shelar : तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?

Ashish Shelar : तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?

रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला.
Published by  :
Siddhi Naringrekar

रंगशारदा सभागृहात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी किती दिवस दुसऱ्यांची ओझी वाहणार. अजुन किती उपमुख्यमंत्री करणार आहात. आता देवेंद्रजींची दया येते. उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधात्मक टोला.

याच पार्श्वभूमीवर आता  भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. शेलार म्हणाले की, म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले? मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला विचारा ना… त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?

तसेच मुंबईसाठी आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशेब देऊच. तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका? तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका. असे शेलार म्हणाले.

Ashish Shelar : तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?
Chandrashekhar Bawankule : देवेंद्रजींच्या मास्टरस्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com