शिरसाटांचे भवितव्य सरकारमध्ये असुरक्षित, तेच उध्दवजींकडे परततील; चव्हाणांचे प्रत्युत्तर

शिरसाटांचे भवितव्य सरकारमध्ये असुरक्षित, तेच उध्दवजींकडे परततील; चव्हाणांचे प्रत्युत्तर

संजय शिरसाटांच्या 'त्या' दाव्यावर अशोक चव्हाणांचा खुलासा

मुंबई : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला होता. ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे शिरसाटांनी म्हंटले होते. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यावर अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाटांनी माझ्यावर भाकीत वर्तवण्यापेक्षा त्यांचेच भवितव्य या विद्यमान सरकारमध्ये असुरक्षित आहे. यामुळे ते उध्दव ठाकरेंकडे नक्की परत येतील, असे चव्हाणांनी म्हंटले आहे.

शिरसाटांचे भवितव्य सरकारमध्ये असुरक्षित, तेच उध्दवजींकडे परततील; चव्हाणांचे प्रत्युत्तर
हे रिक्षाचालक तुमची काय दशा करतील पहाच; सावंतांना 'त्या' विधानाप्रकरणी शिंदे गटाचा इशारा

संजय शिरसाटांनी कोणत्या आधारावर जावई शोध केला आहे हे सांगणे कठीण आहे. त्यापेक्षा हे महत्वाचे आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये शिरसाटांनाच वागणूक व्यवस्थित मिळत नाही ही वस्तूस्थिती आहे. अनेक वेळा ते नाराज झाले आहेत. अनेक वेळा मत्रिमंडळाचा विस्तार होणार अथवा होतोय अशाच चर्चा सुरु आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही यामुळे संजय शिरसाट लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील होतील, अशी शक्यता अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे.

संजय शिरसाटांनी अनेक वेळा प्रयत्न करुन पाहिले. परंतु, त्यांना व्यवस्थित वागणूक मिळत नाहीये. यामुळे त्यांनी माझ्यावर भाकीत वर्तवण्यापेक्षा त्यांचेच भवितव्य या विद्यमान सरकारमध्ये असुरक्षित आहे. यामुळे ते उध्दवजींकडे नक्की परत येतील. शिरसाटांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि निर्णय घेऊन उध्दवजींबरोबर कामाला लागावे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, संजय शिरसाटांच्या भाकीतावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही टीका केली होती. पोपट घेऊन भविष्य बघणारा असतो ना... त्याचा तो पोपट बाहेर येतो आणि एक - एक पत्ता काढून हातात देतो तसे दिसलं की काय त्यांना, असा टोला अजित पवारांनी शिरसाटांना लगावला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com