घटक पक्षांना विचारात घेतलं नाहीतर अडचण होईल; बच्चू कडू यांचा भाजपला इशारा

घटक पक्षांना विचारात घेतलं नाहीतर अडचण होईल; बच्चू कडू यांचा भाजपला इशारा

भाजपने घटक पक्षाची बैठक बोलावली होती, यात बच्चू कडू यांनी दांडी मारली होती. याबाबत बोलताना बच्चू कडूंनी जाहिर नाराजी व्यक्त केली आहे.

अमरावती : भाजपने घटक पक्षाची बैठक बोलावली होती, यात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दांडी मारली होती. याबाबत बोलताना बच्चू कडूंनी जाहिर नाराजी व्यक्त केली आहे. घटक पक्षाच्या नाराजीच कारण भाजपने समजून घेतलं पाहिजे, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे. ते आज अमरावतीत बोलत होते.

घटक पक्षांना विचारात घेतलं नाहीतर अडचण होईल; बच्चू कडू यांचा भाजपला इशारा
खोटं बोलणाऱ्यांना जागा दाखवावीच लागेल; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

बच्चू कडू म्हणाले की, घटक पक्षाच्या नाराजीच कारण भाजपने समजून घेतलं पाहिजे. भाजप मोठा पक्ष त्यांनी लहान पक्षा सोबत कस वागलं पाहिजे ते त्यांनी समजून घ्यावं. युज अँड थ्रो होता कामा नये. लोकसभा निवडणुकीत 2 तर विधानसभासाठी 15 जागा मागितल्या त्यावर भाजप चर्चा करीत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यांना गरज नसेल म्हणून ते असं वागत असेल तर ते चुकीच आहे. भाजपने घटक पक्षासोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्याबाबत विचार करावा नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. माझ्या जागा वाटपावर चर्चा झाली नाही तर अडचणीचा विषय होऊ शकतो, असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com