शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…; बच्चू कडूंचे मोठे विधान

शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…; बच्चू कडूंचे मोठे विधान

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अशात आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील राज्यव्यापी दौरा सुरु करणार आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. अशात आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना एका पत्रावर 52 जातींना ओबीसीत घेतलं. मात्र, मराठा समाजाचाही पत्रात समावेश करायला हवा होता. ओबीसीचं भलं फक्त शरद पवारांनीच केलं, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे.

शरद पवारच खरे ओबीसी नेते, कारण…; बच्चू कडूंचे मोठे विधान
शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे म्हणूनच मी त्यांच्या सोबत गेलो. ते मुख्यमंत्री नसेल तर आम्ही नाही आहे हे स्पष्ट आहे .त्यात काय लपवायच नाही. मुख्यमंत्री बदलणार नाही आणि बदलण्याचा काही कारणही नाही, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे. तसेच, 24 तारखेपर्यत शिंदे समितीने अहवाल द्यायचा आहे. पुण्यात 75 टक्के नोंदी सापडल्या आहे. मराठा म्हणून वेगळं आरक्षण मिळणार नाही ते ओबीसीच आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती त्यांनी निर्माण केल्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना घेतलं असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले, असा आरोप त्यांनी केला.

जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसीमध्ये मराठ्यांना गणलं गेलं. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. मराठा हा ओबीसीमध्येच आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणला विरोध करण्यापेक्षा आरक्षण कसं वाढेल हा विचार केला पाहिजे. आरक्षणाचा वणवा पेटला आहे त्यात सर्व जण आपली किटली गरम करत आहे. तो चहा समाजाला भेटणार नाही हे स्वताः पिणार आहे, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली आहे.

मराठा हा कुणबी नाही तर कोण आहे हे वडेट्टीवार यांनी सांगावं. विदर्भातील मराठा कुणबी चालतो मग मराठवाडामधील का नाही? ही गर्वाची गोष्ट नाही 50 मराठ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्हाला ओबीसी नेते व्हायचं आहे तर व्हा आणखी काही कार्यक्रम करायचा असेल तर करा. काही लोक आरोप करत आहे की बोगस नोंदी होत आहे परंतु हे सर्व हस्तलिखित आहे, असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com