राजकारणात कायम कोणी नाराज नसतं : बच्चू कडू

राजकारणात कायम कोणी नाराज नसतं : बच्चू कडू

नाराजीच्या चर्चा देवेंद्र फडणवीसांनी चर्चा फेटाळून लावल्यानंतर आता बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे.

पालघर : सलग दोन दिवस वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर छापलेल्या जाहिराती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकेची तोफ डागली आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. देवेंद्र फडणवीसांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. यावर आता मंत्री बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात कायम कोणी नाराज नसतं, असे त्यांनी म्हंटले आहे.

राजकारणात कायम कोणी नाराज नसतं : बच्चू कडू
एकनाथ शिंदेंच्या जाहिरात नाट्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचा प्रवास...

जाहिरातीच्या मुद्यावर तांडव करण्यापेक्षा इतर मुद्दे आहेत. खर तर असे मुद्दे थांबले पाहिजे. नको त्या गोष्टी नको व्हायला. राजकारणात कायम कोणी नाराज नसतं. सोयी सोयीनुसार नाराजी असते. राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे. फडणवीस यांचे काम पाहा. नाक कान पाहू नका त्यांच काम मोठं आहे, असे बच्चू कडूंनी म्हंटले आहे.

शासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव आणि तळेगाव मोहना या दोन मंडळांना अतिवृष्टीचा निधी प्राप्त होऊ शकला नाही. याविरोधात बच्चू कडू यांनी थेट सचिवालयात बेमुदत उपोषणाचा शासनाला इशारा दिला होता. याबाबत सांगताना ते म्हणाले, आज मी उपोषणाची नोटीस दिली होती. माझ्या मतदार संघात नुकसान झालं पण व्यवस्थित मदत मिळाली नाही. नियम डावलून तिथं काम केले जात होतं. काम होत नव्हतं म्हणून उपोषणासाठी नोटीस दिली. परंतु, आम्हाला आता न्याय मिळाला जी मागणी होती ती पूर्ण झाली सर्वांचे आभार, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जाहिरात नाट्यावर पहिल्यादांच फडणवीसांनी प्रतिक्रिया जाहिरपणे दिली आहे. आम्ही आजही एकत्र आणि उद्याही सोबत असू. आमचा 25 वर्षांपासून एकत्र प्रवास आहे, पण गेल्यावर्षभरात तो अधिक घट्ट आहे. एका जाहिरातीमुळे सरकारला काहीही होणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com