Udayanraje Bhonsle |Gunaratna Sadavarte
Udayanraje Bhonsle |Gunaratna Sadavarte Team Lokshahi

पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; वकील गुणरत्न सदावर्ते यांचे मागणी

कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी.

आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान डेक्कन ते लालमहालापर्यंत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून लालमहालापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. त्याच मोर्च्यावर आता वकील गुणरत्न सदावर्ते बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.

 Udayanraje Bhonsle |Gunaratna Sadavarte
'चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 1 कोटी 35 लाखांचं अनुदान' - अमित शाह

पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असं सदावर्ते म्हणालेत.

या मोर्चात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या मोर्चात भाजप व मनसे सहभागी झाले नव्हते. पण आता याच मोर्चावरुन वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com