Santosh Bangar
Santosh Bangar Team Lokshahi

शिंदे गटाचे बांगर पुन्हा वादात; तरूणाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने शेअर केली ही ऑडिओ क्लिप.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्याला दमदाटी करताना तर कधी मारहाण करताना असे त्यांचे नेहमी व्हिडिओ समोर येत असतात. त्यातच आज संतोष बांगर यांची एक शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ पाटील यांनी ही ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे.

Santosh Bangar
जागावाटपाबाबत केलेल्या बावनकुळेंच्या वक्तव्यावर आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही पण युतीत...

अयोध्या पौळ पाटील यांनी या ट्विटमध्ये असे लिहले की, शी असला गधळ, गच्च्याळ, संस्कारहीन अन जातीवरुन शिवीगाळ करणारा संविधानीक पदावर बसलेला लोकप्रतिनिधी आहे आणि आपले मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्री यांची पाठ थोपटतात म्हणे?मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यावर काही करवाई करणार का? की कौतुकाने पाठ थोपटणार? असे त्या म्हंटल्या आहे. परंतु, या संबंधित ऑडिओ क्लिपची 'लोकशाही मराठी' पुष्टी करत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com