ठाकरेंच्या सभेआधी मालेगावचे राजकारण तापले; भावी खासदार म्हणून दादा भुसेंच्या मुलाचे होर्डींग

ठाकरेंच्या सभेआधी मालेगावचे राजकारण तापले; भावी खासदार म्हणून दादा भुसेंच्या मुलाचे होर्डींग

नाशिकच्या मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आज सायंकाळी पार पडणार आहे. परंतु, याआधीच मालेगावमधील राजकीय वातावरण तापले आहे.

मुंबई : नाशिकच्या मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आज सायंकाळी पार पडणार आहे. उध्दव ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. परंतु, याआधीच मालेगावमधील राजकीय वातावरण तापले आहे. मालेगावमध्ये भावी खासदार म्हणून दादा भुसेंच्या मुलाचे होर्डींग लावण्यात आले आहे. याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहेत.

ठाकरेंच्या सभेआधी मालेगावचे राजकारण तापले; भावी खासदार म्हणून दादा भुसेंच्या मुलाचे होर्डींग
'अपात्र खासदार...' राहुल गांधींच्या ट्विटरवरील बायोमध्ये बदल

मालेगावमध्ये भावी खासदार म्हणून दादा भुसेंचा मुलगा अविष्कार यांचे होर्डींग लागले आहे. या होर्डींगवर 'अपकमिंग एमपी' अविष्कार दादा भूसे असा उल्लेख करण्यात आला आहे. भुसे समर्थकांकडून हे होर्डींग लावण्यात आले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे दादा भुसेंवर आज निशाणा साधणार असतांनाच दुसरीकडे लागलेले हे होर्डींग चर्चेचा विषय ठरत आहे.

अविष्कार भुसे यांनी धुळ्यात गेल्या वर्षभरात युवा संघटनासाठी काम केलं आहे. त्यामुळे आता ते निवडणुकीच्या शर्यतीत असतील, अशा चर्चा या निमित्ताने रंगत आहेत.

दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी नाशिकहून शेकडो शिवसैनिक हे मालेगावच्या दिशेने रवाना होत आहे. 100 पेक्षा जास्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल वीस हजार शिवसैनिक हे मालेगावला रवाना झाले आहे. जवळपास दीड लाख गर्दी जमण्याची दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यानुसार सभास्थाळी जोरदार तयारी सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com