आम्ही दबावाला आणि दहशतीला घाबरणार नाही; भाई जगतापांची प्रतिक्रिया

आम्ही दबावाला आणि दहशतीला घाबरणार नाही; भाई जगतापांची प्रतिक्रिया

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी संवाद साधला आहे.

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी राहुल गांधी यांनी याचिकेतून केली होती. यावर लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही दबावाला आणि दहशतीला घाबरणार नाही; भाई जगतापांची प्रतिक्रिया
Video : आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हात मिळवणी झाली; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

न्यायालयीन प्रक्रियेत सुरत न्यायालयामध्ये चार दिवस पहिले एका न्यायाधीशाची नियुक्ती होते आणि ते न्यायाधीश राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनवतात. देशाच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं. आम्ही कोणाच्याही दबावाला आणि दहशतीला घाबरणार नाही. जेव्हा आम्ही कन्याकुमारी आलो तेव्हा सर्व अभुतपूर्व होते. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात जोश आणि संकल्प केला होता तो जनतेने यशस्वी केला. यामुळे सर्वांचे धाबे दणाणाले आहेत. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे, असे भाई जगताप यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशात, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. यावर भाई जगताप म्हणाले की, राजकारण दुर्दैवाने अस्थिर झाला आहे महाराष्ट्राच्या भूमीने हे कधी पाहिलं नव्हतं. सध्याचं राजकारण बाजारू पध्दतीने झालेलं आहे. परंतु, आमचे 44 स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी वर्तविला आहे. 50 खोके सब कुछ ओके ही महाराष्ट्राची परंपरा नाही. शाहू फुले आंबेडकरांची परंपरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे परंपरा नाही या एका विचाराने आम्ही सर्व एकत्र आलो होतो, असेही जगतापांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com