Bhajanlal Sharma Rajasthan New CM :  भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

Bhajanlal Sharma Rajasthan New CM : भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राजस्थानमधील मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. राजस्थानमधील निवडणूक निकालानंतर 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भजनलाल शर्मा हे सांगानेरचे आमदार असून पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर ते आता राजस्थानचे मुख्यमंत्री होणार आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com