'मातोश्री दोन झाल्याहेत एक 8 माळ्यांची अन् दुसरी 3 माळ्याची'
मुंबई : शिवसेनेविरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत आहे. अशातच शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मातोश्री दोन झाल्या आहेत एक 8 माळ्यांची आणि दुसरी 3 माळ्याची. आम्ही तीन माळ्याच्या मातोश्रीच पावित्र्य राखतो, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
भरत गोगावले म्हणाले की, तीन दिवस त्यांनी घोषणाबाजी केली. आम्ही केवळ 2 दिवस केली. ती त्यांच्या वर्मी लागली आहे. आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देणार, असा इशारा त्यांनी दिला. बाळासाहेबांनी सांगितले रडायचे नाही लढायचे. त्याप्रमाणे आम्ही लढत आहोत. आम्ही आज देखील त्यांची वाट पाहत होतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
आम्ही पोस्टरच्या माध्यमातुन वस्तुस्थिती मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी बघितले बळासाहेबांचे शिवसैनिक लढतायत की रडतायत. मातोश्री दोन झाल्या आहेत एक 8 माळ्यांची आणि दुसरी 3 माळ्याची. आम्ही तीन मळ्याच्या मातोश्रीच पावित्र्य राखतो. 8 माळ्यांची मातोश्री पायऱ्या चढताना पाय दुखतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले कि कंत्राटी सरकार आहे कधीही जाईल. माझं सांगणं आहे की कंत्राटी कर्मचारी देखील 240 दिवसांत पर्मणट होत असतो, असा निशाणा गोगावले यांनी साधला आहे.
दरम्यान, बुधवारी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना भरत गोगावले यांनी बीएमसी मातोश्री चालवत होती, असा आरोप केला होता. खोके कुठे जात होते ते आज सांगितले. अजून डिवचलं तर अजून बोलू. मातोश्रीविरोधात आता आमची रोखठोक भूमिका असेल, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.