निषेध; उध्दव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर गोगावलेंची प्रतिक्रिया

निषेध; उध्दव ठाकरेंच्या 'त्या' विधानावर गोगावलेंची प्रतिक्रिया

उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल केला होता. यावर आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : स्वतः च्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायाला नालायक आहे आणि सरकारमध्ये रहायचा त्यांना अधिकार नाही, असा घणाघात उध्दव ठाकरे यांनी केला होता. यावर आता शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बोलले आहेत ते चुकीचं आहे, आम्ही त्याचा निषेध करतो, असे गोगावले म्हंटले आहेत.

भरत गोगावले म्हणाले की, मी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद बघितली नाही. पण ते जस बोलले आहेत ते चुकीचं आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. अवकाळी पाऊस झाला आहे. उद्या कॅबिनेट आहे उद्या शेतकऱ्यांवर चर्चा होईल. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही आहे, असे गोगावले म्हंटले आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली आहे. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी सुनिल प्रभू यांची उलट तपासणी सुरु आहे. आमचीही होईल, असे त्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com